|
औरंगाबाद पाटबंधारे मंडळाची स्थापना शासन पाटबंधारे व वीज विभाग निर्णय
क्रमांक एसआरसी 6059(2) दिनांक 30/6/1960 अन्वये औरंगाबाद मुख्यालयी झाली.
हे मंडळ दिनांक 25/7/1960 रोजी मराठवाडा पाटबंधारे मंडळ क्र.2 औरंगाबाद या
नामाभिधानाने अस्तित्वात आले. त्यावेळी या मंडळाकडे मराठवाडयातील मध्यम व
ल.पा. प्रकल्पांचे बांधकाम व पूर्ण झालेल्या मध्यम व ल.पा.प्रकल्पांच्या
व्यवस्थापनाचे काम होते |
| |
सन
1975 पासून परभणी व नांदेड जिल्हयातील मध्यम व ल.पा.प्रकल्पांची सर्व कामे
नांदेड पाटबंधारे मंडळ, नांदेड या मंडळाकडे वर्ग झाली. सप्टेंबर 1982 पासून
उस्मानाबाद पाटबंधारे मंडळाची स्थापना झाल्यानंतर उस्मानाबाद व लातूर
जिल्हयातील कामे उस्मानाबाद पाटबंधारे मंडळाकडे वर्ग झाली. सद्य:स्थितीत
औरंगाबाद व जालना जिल्हयातील मध्यम व ल.पा.(राज्यस्तर) योजनांचे बांधकाम व
व्यवस्थापनाचे काम तसेच नांदूर मधमेश्वर कालवा व गोदावरी नदीवरील (6)
बॅरेजेसची कामे अशी मोठया प्रकल्पाची बांधकामे या मंडळाकडे आहेत. |
| |
|
महाराष्ट्र शासन अंगिकृत गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ,
औरंगाबाद अंतर्गत हे मंडळ कार्यालय कार्यरत असून या मंडळांतर्गत औरंगाबाद व
जालना जिल्हयातील मोठे, मध्यम व लघु पाटबंधारे प्रकल्पांची बांधकामे चालू
आहेत. |
|
This website is official website of Superintending Engineer, Aurangabad
Irrigation Circle, Aurangabad
(A office under Government of Maharashtra Water Resources Department)
©2012
Aurangabad Irrigation Circle, Aurangabad. |
|